......... काही असे सर्वांसाठी.........
आपल्याबरोबर कोणीही केलेला अन्याय आपण वारा,पाणी किंवा रेतीवर लिहून विसरुन जायचे आहे. पण आपल्यावर कोणीही केलेला उपकार मार्बलच्या पट्टीवर लिहून सतत लक्षात ठेवायचा आहे...

Saturday, May 21, 2011

आपले कॉंग्रेस सरकार ......

आपले सरकार......

आपण मूर्ख आपल्या सरकारच्या दूरदृष्टी ला समजू नाही शकलो...

ओरडत राहतो कि महागाई वाढली.....महागाई वाढली.......

सरकार ने पेट्रोल चे शुल्क वाढवले कारण .........तुम्ही पायी चालाल...सायकल आणि बस चा वापर कराल

पायी चालल्याने आणि सायकल वापरल्याने प्रकृती सुधारेल,आरोग्य चांगले राहील, पैसे वाचतील, पर्यावरण सुधारेल.........ग्लोबल वार्मिंग वर पण लक्ष आहे ना ????

" बस " ने प्रवास कराल तर ओळख-परिचय वाढेल, माणुसकी पुन्हा वृद्धिंगत होण्यास मदत होईल.....

**** आहे ना दूरदृष्ठी असलेले समाज हित जोपासणारे जनहितचिंतक आपले सरकार ????

आपण सामान्य जनताच मूर्ख आहोत कारण आपण सरकारच्या भावना नाही समजू शकत ****

दिपक निकुंभ....

Sunday, April 3, 2011

हिंदू-नववर्ष......गुढीपाडवा .......

मराठीच्या वर्षाचा आरंभ झाला..
दिवस तो शुभमुहुर्ताचा,
गुडी उभारुन मान उंचवण्याचा..

आता सारी मंडळी..
धुलवडीच्या नशेतून बाहेर आली..
नववर्षाची कशी
जय्यत तयारी सुरु झाली..

सजायला लागली मंदीरे
सजायला लागली घरे..
भिंतीवरी घराच्या चढवु लागली..
रंगरंगोटीची नव नवीन थरे..

साडेतीन मुहुर्ताचा दिस म्हणून
खरेदीचा बेत आखू लागले..
फुलांच्या माळानी दाराची तोरणे सजवू लागले..

आता सुरू झाली गुढीची तयारी
तीला नेसवली साडी नवारी..
नटली गुढी मराठमोळ्या परंपरेची..
मान उंचावुन सांगते ती गाथा शुरविरांची...

चला गुळ खोबरं वाटूया..
गुढीसमोर पुरणपोळीचा नैवद्य ठेवूया..
ह्या भरकटलेल्या समाजाला गुढीचं पावित्र्य सांगून
सहकुटुंब दोन्ही हाताने वंदन करूया..

मित्र मैत्रिणिनो गुढीपाडवा म्हणजे
चैत्र शुध्द्प्रतिपदा ..
तुम्हाला या मराठी वर्षाची..
जाण राहुदे सदासर्वदा...

आता उभारा गुढी समजूतीची
उभारा ग़ुढी माणुसकीची..
पेटवा मशाल तारूण्याची..
मग चला तर ग़ुढीपाडवा साजरा करू..
अन शान वाढवूया या विजयी महाराष्ट्राची....

गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.......

Thursday, December 23, 2010

नशीब....!!!

नशीब त्यानं काम केलं दिवसभर
आणि श्रमाला तो रात्रभर
त्यानं मौज मजा सोडली
आणि काही गोष्टींच सुख त्यानं
अवघड पुस्तक वाचली
आणि काही नव्या गोष्टी आत्मसात केल्या
आणि पुढे मुसुंडी मारली यशस्वी होण्यासाठी
त्यानं उदंड कष्ट घेतले आत्मविश्वासाने
आणि धीर्याने तो पुढे झेपावत राहिला
आणि तो जेव्हा यशस्वी ठरला
तेव्हा लोक म्हणू लागले - नशीबवान आहे तो !!!

...दिपक निकुंभ!!!  

आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

गंध आवडला फुलाचा म्हणून फूल मागायचं नसतं अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
परक्यांपेक्षा आपलीच माणसं आपल्याला नेहमी दगा देतात,
एकमेकांच्या पाठीवर मग् नजरे आडून वार होतात
भळभळणा-या जखमेतून विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा आपणच पुसायचं असतं......अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपलं सुःख पाहण्याचा तसा प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं हा कुठला न्याय आहे...
माणूस म्हणुन माणसावर खरं प्रेम करायचं,
आपल्या साठी थोडं, थोडं दुस-यासाठी जगायचं
जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं असतं...अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं...

आपल्याला कोणी आवडणं हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते आकर्षणंच असतं...
मान्य आहे, आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं
मन् आपलं वेडं असतं वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा वेळीच त्याला आवरायचं अशावेळी....आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं......(संग्रहित)    

...दिपक निकुंभ!!!    

चेहरा...

आपला चेहरा हा आपल्या मनाचा आरसा असतो. प्रत्येक चेहरा काहीना काही बोलत असतो. चेहरा हा मनाचा आरसा आहे पण आपल्याला माहित असायला हव की अरसा सुधा कधी खर असतच अस नसत आरसा हा कधी सजवते तर कधी फसवते सुधा. चेहरयावर जावू नका. चेहरयावर कधी सोंदर्य कधी निष्पाप हास्य कधी खुप काही लपवन तर कधी एक कोड होवून राहण. आयुष्याच्या वाटेवर बरेच चहरे भेटतात ठेच लागल्यावर स्वताला सवरल तर ठीक.....    

...दिपक निकुंभ !!!